top of page

करसाळ

  • Writer: Harshali
    Harshali
  • Aug 18, 2020
  • 2 min read

Updated: Aug 19, 2020

लेखिका: माधवी वागेश्वरी

एपिसोडस : १०

व्हॉईसओव्हर आर्टिस्ट: ऋता पंडित, साईनाथ गणुवाड, उर्मिला निंबाळकर, गजानन परांजपे


हि कथा चालूच होते ते ऋता पंडितच्या आवाजात म्हणजे आजीच्या पात्राने. पावसाची रिपरिप, ऋता पंडितचा गूढ आवाज, आणि त्यात वर्णन केलेलं परिस्थिती तुम्हाला त्यात फक्त अडकवून ठेवतात. या कथानकात मुख्यतः ४ पात्रे आहेत, आजी, आजोबा,नचिकेत आणि संहिता, जी तुम्हाला कथानकात पुढे घेऊन जातात. असं जरी असेल तरी कथानक मेलेल्या चित्रा भोवती फिरत राहते.


यातल्या प्रत्येक पात्राला लेखिकेने एक वेगळी आणि स्वतंत्र छटा दिलेली आहे. त्यामुळेच कधी यांच्यापैकीच कोणीतरी चित्राला मारल्याचा संशय येतो तर कधी यांचीच कीव येते. कथानक जसजसे पुढे जाऊ लागते तसतसे त्यातली पात्रं उत्सुकता ताणून धरतात. 'करसाळ'चा खरा अर्थही कथेच्या शेवटी शेवटी अगदी चपखल आणि समर्पक वळणावर कळतो. भीती दाखवत आणि अनपेक्षित वळणं घेत पुढे सरकत असलेली कथा, जेव्हा शेवटास येते तेव्हा खूप मोठा आश्चर्यकारक धक्का देते, आणि तो धक्का काय असेल हे समजून घेण्यासाठी तरी तुम्हाला हि कथा ऐकायलाच हवी.


या कथेचं श्रेय जेवढं लेखिकेला तेवढंच याला आवाज देणाऱ्या किंबहुना आवाजानेच जिवंत करणाऱ्या व्हॉइसओव्हर आर्टिस्टला आहे. त्यांनी कथेतला प्रत्येक प्रसंग डोळ्यापुढे अगदी हुबेहूब साकारला आहे. तेव्हा नक्कीच हि 'करसाळ' हि कथा ऐकायला विसरू नका. ज्यांना डोक्याला जरा ताण देणारी, थोडीशी भयानक पुस्तकं ऐकायला आवडतात, तर मित्रांनो हे पुस्तक तुमच्यासाठीच बनलेलं आहे.


माझ्या कित्येक मित्रमैत्रिणींना अशी ऑडिओ बुक्स वाचणं नको वाटतं तर त्या सगळ्यांसाठी मी याच ब्लॉग मध्ये मी वापरत असलेल्या ऑडिओबुक्सच्या माध्यमांबद्दल इथे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करते. पुस्तक प्रेमी म्हणून मला नेहमीच जितकी पुस्तकं वाचावी तितकी कमीच वाटतात आणि आजकाल तर बऱ्याचदा सगळ्यांनाच पुस्तक वाचायला वेळ मिळेल असं नाही. जर तुम्ही परदेशात असाल तर तुम्हाला मराठी पुस्तकं मिळणं फारच अवघड होऊन जातं. अशावेळेस हे Audiobooks कामाला येतात.


सर्वात प्रथम ऑडीबल.ऑडीबल हे ३० दिवस मोफत पुस्तक मिळवण्याचं अतिशय उत्तम कायदेशीर ठिकाण आहे. इथे तुम्ही जेव्हा लॉगिन कराल तेव्हा तुमचा ३० दिवसांचा फ्री ट्रायल सुरू होतो आणि बरीच पुस्तक तुम्हाला काही पैसे खर्च न करता उपलब्ध होतात, ३० दिवसांच्या आत तुम्ही मेम्बरशिप रद्द करू शकता. जेव्हा तुंम्ही इथे लॉगिन करता तेव्हा तुम्हाला काही क्रेडिट पॉईंट्स मिळतात जे वापरून तुम्ही महागातली पुस्तकं हि कमी किंमतीत किंवा मोफत मिळवू शकता. ऑडीबल नंतर स्टोरीटेल हे अजून एक अँप आहे. जिथे तुम्हाला फ्री ऑडिओबुक्स आणि Audioseries भेटतात, पण इथे फक्त १४ दिवस तुम्हाला फ्री पुस्तक मिळतात. नंतर २९९/महिना अशी फी भरावी लागते वापरून बघा ३-४ पुस्तक सहज ऐकून होतील आणि मग ट्रायल संपायच्या अगोदर तुम्ही हि मेम्बरशिप रद्द करू शकता.


PS. तुम्हा सर्वांसाठी मी खाली ऑडीबेल आणि स्टोरीटेलची लिंक खाली देत आहे. खाली दिलेल्या आयकॉन वर फक्त क्लिक करा.










Kommentare


Subscribe Form

©2020 by मनातलं... Proudly created with wix.com

bottom of page