रिच डॅड पुअर डॅड
- Harshali
- Aug 29, 2020
- 2 min read
Updated: Nov 4, 2020
लेखक: रॉबर्ट कियोसाकी
प्रकाशन: टाईम वॉर्नर बुक युके ( १ डिसेंबर, २००७ )
पृष्ठसंख्या: १९५
मूल्यांकन: ४/५
तुम्ही जर मुळातच अर्थकारण म्हटलं कि भुवया उंचावणारे असाल आणि इच्छा असूनही केवळ भीतीपायी हा विषय टाळत असाल, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. या पुस्तकात लेखकाने त्याच्या दोन वडिलांबद्दल सांगितले आहे. एक त्यांचे स्वतःचे वडील म्हणजेच 'पुअर डॅड' आणि एक त्यांच्या मित्राचे वडील म्हणजेच 'रिच डॅड'. लेखकाने या दोन्ही डॅडकडून मिळणारी शिकवण पुस्तकात योग्य रीतीने मांडली आहे.

लेखकाचे पुअर डॅड हे उच्चशिक्षित, मेहनती आणि चांगल्या पगाराच्या नोकरीवर, पण एवढे असूनही त्यांना पैशाची चणचण नेहमीच भासत असे. याउलट पुअर दंड ते मेहनती नक्कीच होते पण शिक्षणाने त्यामानाने कमी, स्वतःचा व्यवसाय करणारे आणि तरीही पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने करणारे.

पुअर डॅड हे नेहमीच- इतर पालकांप्रमाणे- चांगलं शिक्षण घेऊन, चांगली नोकरी मिळवून आयुष्यात स्थिर होण्याचा सल्ला लेखकाला देत असत, आणि यालाच रिच डॅड 'रॅट रेस' म्हणत. याच रॅट रेस मधून बाहेर पडणं किती महत्वाचं आहे, हे पुस्तक वाचून तुमच्या लक्षात नक्कीच येईल. या दोन्ही विचारसरणीचा अभ्यास केल्यानंतर लेखकाने 'रिच डॅड' च्या विचारसरणीप्रमाणे चालण्याचा विचार केला.

पैशानेच पैसे कसे मिळवता येतात याकडे संपूर्ण लक्ष वेधले आहे आणि हाच या पुस्तकाचा मूळ विचार आहे. या पुस्तकातील संकल्पना आपल्या प्रचलित आर्थिक समजुतींना सरळ सरळ धक्के देतात. लेखकाने कॅशफ्लोचा सिंद्धांत देखील अगदी सामान्य माणसालाही समजेल आणि पटेल, अशा साध्या आणि सरळ भाषेत मांडला आहे. आपली आवड लक्षात घेऊन, त्याचा वापर करून आपण पैशानेच पैसे कसे वाढवू शकतो आणि त्यासाठीच सर्वांगीण अभ्यास करणं देखील किती गरजेचं आहे यावर भर दिला आहे.

खरंतर आजच्या युगात आर्थिक शिक्षण हि काळाची गरज आहे हे ओळखून आपण सजग होणं खूप जरुरी आहे आणि त्यासाठी हे पुस्तक नक्कीच तुम्हाला मदत करेल एवढी हमी मी नक्कीच देते. या पुस्तकासाठीची लिंक मी खाली दिलीच आहे.
IMAGE COURTESY- GOOGLE
PAPERBACK:
1.रिच डॅड पुअर डॅड [इंग्रजी]
2. रिच डॅड पुअर डॅड [मराठी]
छान लिहिलं आहे बुक. पण त्यावेळच्या परिस्थितीनुरूप लिहिलं गेलं आहे. आणि सध्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे. एक नवीन अवृत्त्ती आली ह्या परिस्थिती शी अनुरूप तर खूपच छान. पण शिकण्यासारखं खूप आहे ह्या बुक मधुन.