top of page

पत्रं..!

  • Writer: Harshali
    Harshali
  • Apr 8, 2020
  • 2 min read

प्रिय... ,

तुला कोणत्या नावाने हाक मारु? तसं सगळ्यांनी आपापल्या परीने तुझं नाव ठेवायला सुरुवात केलीये म्हणा, पण मला तुला साजेसं आणि शोभेल असं काही सुचेना अजून. तसं हि नावात काय आहे म्हणा! तू आमच्या आयुष्यात इतका आनंद घेऊन आलाय या उपर काय हवंय अजून आम्हाला. आजकालच्या काळात इतक्या जणांना एकाच वेळेस खुश करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आज पहिल्यांदाच मावशी बनल्यावर इतका आनंद का होतो ते कळलंय. तुझ्या छोट्या मिचमिचणाऱ्या डोळ्यांनी तू तर बघतोयसच आणि तुझ्या त्या इवल्याशा कानांवर समजायला कठीण असलं तरी जगाची किती अवघड परिस्थिती आहे, काय काय चाललंय हे पडत असेलच. पण तू काय फार लक्ष देऊ नकोस, घाबरून तर अजिबात जाऊ नकोस. आता याची सवय तुला करून घ्यावीच लागणार. तू जसा मोठा होशील तेव्हा तू अगदी सगळ्यांकडून ऐकशील कि कसा तू लहान असताना 'कोरोना' आला होता वगैरे वगैरे. त्यावरून दुसऱ्या देशांना, स्वतः निवडून दिलेल्या सरकारला दूषणं देताना हमखास हि सगळी माणसं दिसतील,पण तू मात्र या सगळ्याची सत्यता पडताळून मग स्वतःच मत बनव.आजकाल स्वतःच मत असणं हि फार मोठी गोष्ट आहे.

तुझ्या आई-बाबांपेक्षा इतरांनी तर एव्हाना तू मोठा होऊन काय होशील हे हळूहळू मनात ठरवायला सुरुवात हि केलीये. तुझ्या स्वभावाचा अंदाज हि बांधायला सुरुवात केलीये. आहे ना हसण्यासारखी गोष्टं. तू मात्र या सगळ्याचं अजिबात ओझं बाळगू नकोस.तुला जे हवं ते तू बन, पण अगदी प्रामाणिकपणे कष्ट करून त्यात निपुण मात्र जरूर हो. जसा जसा तू मोठा होशील सगळे तुला सांगतील पैसा हेच सुखाचे,यशाचे आणि प्रगतीचे मोजमाप आहे. काही अंशी हे बरोबर असलं तरी प्रत्येक वेळेस सुख हे पैशात मोजू नकोस.

आपली मावशी हे जगाच्या वेगळंच काहीतरी का बोलत आहे? हिला बहुतेक माझ्या वयाचा विसर पडला कि काय, असं तुला वाटत असेल अन ते अगदीच साहजिक आहे. पण नंतर हे पत्रं वगैरे संकल्पना मागे पडून कायमच्या हरवतील कि काय ह्या भीतीने आताच लिहून ठेवतीये.आयुष्यात खूप मोठा हो,पण ते इतरांच्या नजरेसाठी नाहीतर स्वतःच्या आनंदासाठी. स्वतःला ओळखून स्वतःवर विश्वास ठेव नेहमी! मग मार्ग कितीही खडतर असला तरी विजय तुझाच होईल. आता मात्र हे पत्रं पुरे करते. खूप खूप आशीर्वाद तुला!

तुझीच मावशी.


 
 
 

5 Comments


tejaspisal2394
Jul 14, 2020

अप्रतिम ❤️

Like

anitasingh1803
Apr 14, 2020

Very nice blog.Loved it

Like

sagar12varal
Apr 08, 2020

खूप छान लिहिलंस....अशी care करणारी...भविष्याचं वास्तव सांगणारी अशी मावशी असल्यावर मुलाला काळजी करण्याची काही कारण नाही..


Like

shravanikale90
Apr 08, 2020

सुंदर...तुझे विचार आणि मराठी लेखन पण...

Like

bhandaresag
Apr 08, 2020

Apratim lihilay patra👌

Ani amcha Ashirwad balala..

Like

Subscribe Form

©2020 by मनातलं... Proudly created with wix.com

bottom of page