top of page

अगदी मनातलं..

  • Writer: Harshali
    Harshali
  • Jan 17, 2020
  • 1 min read

Updated: May 22, 2020

नमस्कार!! Hi, Hello च्या काळात नमस्कार करणारी हि जुनाट व्यक्ती कोण ?असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे ,म्हणूनच अधिक वेळ न घालवता माझी छोटीशी ओळख करून देते. मी हर्षाली. नुकतीच लग्न झालेली अन विदेशात स्थायिक झालेली, सध्यातरी बेरोजगार असलेली एक युवती. या सुंदर आणि शांत देशातही, घरापासून दूर असल्याने कधीतरी खूप एकाकी वाटतं अन तेव्हा नकळतच भावना शब्दांचं रूप घेऊन कागदावर उमटतात.हे सगळं इंग्रजीमधून हि छान जमवता आलं असतं पण मग तो ओलावा हरवेल असं मला वाटलं. इंग्रजी ही जरी उत्तम प्रतीची भाषा असली तरी तिला माझ्या मराठीची गोडी येत नाही किंवा कदाचित मला ती तितकीशी जाणवत नाही. दूर  राहिल्याने प्रेम वाढते म्हणतात,भाषेच्या बाबतीत ही तसच काहीसं होत असावं. माझी माय मराठी मला नेहमीच या कडाक्याच्या थंडीत छानशी ऊब देते आणि म्हणूनच हा सगळा मराठीतून व्यक्त होण्याचा खटाटोप. कधी कधी मनामध्ये भावनांचा इतका कल्लोळ माजतो कि त्यांना पटकन वाट मोकळी करून द्यावी असं वाटतं.कोणाला तरी सांगावं असं खूप वाटायला लागतं पण प्रत्येक वेळेस हलणारी,डुलणारी आणि घडाळ्याच्या काट्यावर पळणारी माणसं कधीतरी वेळेमुळे किंवा परिस्थितीमुळे पूरी पडत नाही आणि मग ह्या भावना कागदावर अनायासे उतरतात आणि अगदी मनातलं बोलुन जातात!

ree

 
 
 

2 Comments


swapnilmurkibhavi
Apr 14, 2020

Really awesome 👌

Like

rekhawarkhade
Jan 23, 2020

Very nice

Like

Subscribe Form

©2020 by मनातलं... Proudly created with wix.com

bottom of page