top of page

सुंदर मी होणार !

  • Writer: Harshali
    Harshali
  • Jan 30, 2020
  • 2 min read

Updated: May 22, 2020

नमस्कार,

माझ्या पहिल्या वहिल्या ब्लॉगला तुम्ही मनापासुन दाद दिली, हक्काने सूचना केल्या आणि अगदी तेवढ्याच प्रेमाने कौतुक हि केलंत त्याबद्दल सर्वप्रथम खूप आभार. तुम्ही म्हणाल ते सर्व ठीक आहे पण हे शिर्षक? काळजी नसावी, मी काही सुंदर दिसण्याचे उपाय ,सात दिवसात गोरे व्हा असं काहीही लिहिणार नाहीये.मी बोलणारे थोडंसं वेगळं पण अगदी मनातलं!

काही दिवसांपूर्वी टीव्हीवर एका सुंदर मुलीचा inspirational video बघण्यात आला. या आधीही मी तिच्याबद्दल बरंच काही वाचलेलं,ऐकलेलं होतं पण माहित नाही का पण यावेळेस ते बोलणं जास्त भावलं. कदाचित वाचण्यापेक्षा तिला स्वतःला बोलताना बघत असल्यामुळे असेल. त्या मुलीचं नाव 'लक्ष्मी'. खरं सांगू का तिला ऐकल्यानंतर मला तिच्याबद्दल सहानभूती नाही तर स्वतःचीच लाज वाटली. कारण चेहऱ्यावर पिंपल आला म्हणून टेन्शन घेणारी, ड्रेस चांगला दिसत नाहीये म्हणून कधीकधी नवऱ्यावर वैतागणारी मी, तिच्यासमोर फारच खुजी वाटायला लागले. चेहरा हा आपल्या व्यक्तित्वाचा महत्वाचा भाग आहे आणि तो सुंदर दिसावा यासाठी प्रयत्न करणं हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे आणि तो नक्कीच असावा. परंतु सुंदरतेची व्याख्या म्हणजे सुंदर चेहरा असं वाटणं कितपत योग्य आहे? केवळ बाह्यसौंदर्यावरून एखाद्याला कमी लेखणं, त्याबाबत टिप्पणी करणं हे खरंच तितकासा योग्य आहे का? दुसऱ्याचं तर सोडाच पण स्वतःचा आत्मविश्वास,moods,वागणं यावर जर दिसण्यामुळे परिणाम व्हायला लागला तर मात्र आपण चुकतोय हि जाणीव व्हायला हवी आणि ती लवकरात लवकर व्हायला हवी. तुम्हाला मी हे सगळं एवढ्या तळमळीने न निश्चयपूर्वक सांगतेय कारण हे सगळं मी केलंय म्हणजे अगदी टिप्पणी करण्यापासून ते स्वतःच्या mood swigs पर्यंत. त्यामुळेच जेव्हा लक्ष्मीचा विडिओ पहिला,ऐकला तेव्हा एक जोरदार चपराक बसल्याची जाणीव झाली. हो म्हणजे याचा अर्थ हा नाही कि मी पूर्ण बदललीय पण एक मात्र नक्की बदलाची सुरुवात मात्र झालीये. एवढं मात्र नक्की कि निर्मळ मन, खळखळून हसणं, एखाद्याला जमेल तेवढी मदत करणं, आपली इच्छा जपणं आणि सगळ्यात महत्वाच जमेल तसं आणि जमेल तेव्हा एखाद्याजवळ आपलं मन मोकळं करणं या गोष्टी हि तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास, समाधान आणि last but not the least चेहऱ्यावर glow हि आणतात. सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करणं यात गैर काहीच नाहीये पण फक्त त्यालाच महत्व देणं यात मात्र सगळंच काही गैर आहे, हे मात्र पूर्णपणे कळलंय. माझं बऱ्याच जणांना याबाबतीत पटणार नाही पण वरती जे काही मांडलंय ते सगळंच अगदी मनातलं आहे.

 
 
 

3 comentários


akash084010109
31 de jan. de 2020

अगदी खरं आहे. चेहरा एक एडऑन असू शकतो पण खरं सौंदर्य माणूस आत्मविश्वासू असेल तरच खुलुन दिसत. वाईट त्या लोकांच वाटत ज्यांना , या सौंदर्यापेक्षा कृत्रिम दिखाऊपण जास्त भावून जातं

Curtir

bhandaresag
31 de jan. de 2020

Khup khup sundar

Curtir

shravanikale90
30 de jan. de 2020

अगदी खरे बोललीस तू... मनाचा निर्मळपणा असला कि तो चेहरा नेहमीच भावतो...

Curtir

Subscribe Form

©2020 by मनातलं... Proudly created with wix.com

bottom of page