तिसरी घंटा..!
- Harshali

- Apr 29, 2020
- 3 min read
नमस्कार, खूप दिवसांपासून या विषयावर बोलावसं वाटत होतं, पण कुठून आणि कशी सुरुवात करावी हेच कळत नव्हतं. शेवटी ठरवलंच आणि लिहायला सुरुवात केलीये. हा विषय माझ्या फारच जिव्हाळ्याचा असल्याने लेख मोठा होऊ शकतो पण तरीही तो interesting असेल हि शाश्वती देते. तिसरी घंटा! नाटकप्रेमी आणि नाटकरांच्या चटकन लक्षात आलं असेलच कि मी हा सगळं पसारा कशाचा मांडलाय ते. हा सगळं खटाटोप आहे तो 'नाटका'साठी. डोळे झाकले आणि नाटक म्हटलं तर मला काय आठवत माहितीये? लाकडी स्टेज, त्यावर lightsman चेक करत असलेल्या lights,मोठा लाल पडदा ओढून घेतलेला- प्रेक्षकांच्या आणि तुमच्यामधली दुरी अजून काही काळ ताणून धरण्यासाठी,प्रेक्षकांचे आवाज,स्टेज वर चाललेली धांदल आणि त्यांनतर वाजणारी तिसरी घंटा! प्रत्येकाने अनुभवलेला हा नाट्याविष्कार वेगवेगळा असू शकतो. माझ्यासारखेच अनेकजण 'नाटक' या अद्भुत अनुभवाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाग बनलेले असतात. कोणी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतून भाग घेतात किंवा कोणी हौशी नाट्यसंस्थांतून. कोणी संगीत नाटकाला पुरुज्जीवन देण्याचा प्रयत्न करतात तर काही केवळ ४५ मिनिटात रंगमंचावर जादू करतात. यातले काहीजण याच क्षेत्रात रमतात-अगदी मोजक्या आणि खऱ्या शब्दात सांगायचं तर तग धरतात. तर काहीजण अगदी प्रामाणिकपणे प्रेक्षक बनून नाट्याविष्कार अनुभवतात. मी जी नाटकं केली त्या अनुभवावरून माझ्यासाठी नाटक म्हणजे रंगमंचावरच्या ४५ मिनिटासाठी २-३ महिने अक्षरशः १०-१२ तास जीव तोडून मेहनत करणे.कॉलेज मध्ये असताना आणि कॉलेज नंतर हि अनेक नाटक केलीत, पण या सगळ्या प्रवासात सगळ्यात जवळच आणि ज्यामुळे मी या अद्भुत नाट्याविष्काराच्या जास्तच जवळ आले ते नाटक म्हणजे 'आषाढ शुक्ल पक्ष ११'! नावाजलेल्या 'फिरोदिया करंडक' साठी हि एकांकिका करण्याची ठरवली ज्यामध्ये गाणी, नाच ,वेगवेगळ्या activities असतात, थोडक्यात एखाद्या फिल्मसारखं सगळं काही मांडायचं .ज्यावेळेस आम्ही कॉलेज मध्ये नाटकं करायला लागलो तेव्हा त्यात कुणीही प्रस्थापित न्हवतं.हौशी लोक एकत्र आली आणि कॉलेजचा नाटकाचा ग्रुप बनला.आमचं नशीब मात्र नक्की चांगलं होतं कारण आम्हाला सिनियर नाटकाची जाणीव असणारे भेटले. Script तयार झाली, कुठंली गाणी घ्यायची, त्यावर कोणत्या पद्धतीचा डान्स बसवायचा हे सगळं तयार झालं. आणि मग त्यापद्धतीने सगळ्या टीमची जमवाजमव चालू झाली. सगळया ऑडिशन्स नंतर सगळी टीम जमली. प्रत्येकाला त्यांचे त्यांचे पार्टस सांगण्यात आले. त्यातले काही जण डान्स आणि acting करणारे होते. सगळे मिळून सेट बनवायचे. हाताला,कपड्याला फेविकॉल लागणं,खिळे लागणं हे सगळं होत असताना हि त्यात त्रास मात्रं कसलाच न्हवता, उलट होतं ते सुख ! आपापली comfort zone सोडून नाटकाला उंचीवर नेण्यासाठी सगळेच जण प्रयत्नशील होती. एकामागून एक scene बसले गेले. मग सुरु झाली ती रिहर्सल! २०-३० जण एकत्र काम करणार म्हणजे खटके हे उडणारच! बऱ्याच वेळा एकमेकांशी पटायचं नाही, वाद व्हायचे;पण हे सगळं होऊन हि टीम एकत्र होती केवळ हे नाटक कोणा एकाच नाही तर आपलं आहे या भावनेपायी. रिहर्सल चांगल्या होत होत्या.नाटकाने चांगल्याप्रकारे जम बसवला होता. आणि तो दिवस आला. आमचं नाटक अगदी सकाळी होणार होतं. त्यामुळे सकाळी ४ ला जमण्याचा सूचना देण्यात आल्या. सगळ्यांच्या मनात धाकधूक होतीच. पण सगळ्या सिनिअर्स येऊन आम्हाला धीर दिला आमचा कॉन्फिडन्स वाढवला. इतके दिवस सगळं छान पार पडत होतं पण उद्या ऐनवेळी काही होऊ नये यासाठी सगळ्यांचा आटापिटा चालला होता.त्या रात्री झोप अशी काही नीट आलीच नाही. डोळे झाकले तरी स्टेज दिसायचा. मी अभिनय करत असल्याने उद्या अचानक आवाज तर बसणार नाही ना? सगळं नीट होईल ना? आपण काही विसरणार तर नाही ना? अशी सारखी भीती वाटत होती. अशातच सकाळ झाली. दिग्दर्शकाने किती हि ओरडलं तरी रिहर्सलला थोडे का होईना उशिरा येणारे आम्ही, त्यादिवशी मात्रं पहाटे ४ वाजता रिहर्सल हॉल वर जमा झालो. निघताना कॉलेजच्या नाट्यपरंपरेप्रमाणे एकमेकांचे हातात धरून, डोळे झाकून ओम उच्चारण्यात आलं.सेटचं सगळं सामान टेम्पो मध्ये भरण्यात आलं. त्यासोबत काही जण गेले आणि मग उरलेले आम्ही सगळे गाड्यांवरून निघालो. तिथे पोहचल्यावर सेट वर चढवण्यात आला. आणि काही वेळातच आम्हालाही आत घेण्यात आलं. मग प्रत्येकाची costume घालण्याची, मेकअप करण्याची घाई चालू झाली. आमचे मेकअप होईपर्यंत वरती सेट लावणं चालू हि झालं.त्यातच पहिली घंटा झाली. मग अजूनच पळापळ वाढली.lightsman पटापट lights घेण्यासाठी ओरडू लागला. भीती आणि धाकधूक दोन्ही वाढू लागली. हे सगळं चालू असताना आमचं मनोबल वाढवण्याचं काम बाहेर बसलेले आमचेच मित्र,मैत्रिणी,फॅमिली मेंबर्स करत होते.अशातच दुसरी घंटा हि झाली. एव्हाना सगळं काही चेक करून झालं होतं. music department चे माइक चेक हि घेऊन झाले होते. दिग्दर्शकाकडून ऑल सेट चा फायनल कॉल घेण्यात आला आणि तिसरी घंटा झाली! पडदा हळूहळू उघडू लागला. नाटकाची सुरुवात करणारे पहिलं वाक्य music department कडून उच्चारलं गेलं- 'बोला पुंडलिक वरदे ,हरी विठ्ठल'. नाटक सुरु झालं! एकामागून एक scene संपत होते. प्रेक्षकांची वाहवा, टाळ्या हव्या त्या ठिकाणी मिळत होत्याच पण अनपेक्षित ठिकाणी हि आम्ही टाळ्या घेत होतो. नाटकाची ती जादू आम्ही सगळे एकत्र मिळून अनुभवत होतो, जगत होतो. हळुहळु नाटक शेवटाकडे येऊ लागलं. तिथपर्यंत नाटक अगदी ठरल्याप्रमाणे ताणून धरण्यात आम्ही यशस्वी झालो होतो त्यामुळे शेवटचा suspense उघडल्यानंतर लोकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. 'विठूचा गजर, माऊलीचा गजर' या माऊलीच्या गजरात नाटकाचा पडदा पडला.लोकांनी नाटक अक्षरशः उचलून घेतलं. बाहेर पडल्यावर प्रत्येक जण प्रत्येकाची पाठ थोपटत होता. या जादूचे अनेक जण साक्षीदार झाले होते. प्रत्येकाने केलेल्या मेहनतीला फळ मिळालं, नाटक पुढच्या फेरीत गेलं. त्या फेरीत मात्रं आम्ही म्हणावं तसे यशस्वी झालो नाही. Individual prizes मिळवली असली तरी खूप प्रयत्न करूनही आम्ही करंडक घेऊ शकलो नाही, हे दुःख आहेच. पण या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे नाटकाने जीवन जगण्यासाठी दिलेली अनुभवाची आणि आठवणींची शिदोरी मात्रं कायम बरोबर राहील! आणि म्हणूनच या लेखातून मी या सगळ्यासाठी माझ्या माय रंगभुमीचे आभार मानते. तुझे उपकार कधीही ना फिटण्यासारखे!





हे सगळे वाचून मला तुझे माऊली नाटक आठवले... आपल्या तेव्हाच्या सगळ्या गप्पा आठवल्या... Brilliant ❤️
खुप छान बबडे .
छोट्याशा लेखाने मला पटकन भुतकाळाची सफर घडवली. ईंटर स्कुल कॉलेज कॉर्पोरेट कॉंपेटीशन चे सगळे सहकारी समोर येउन थाटले.. घरची जबाबदारी आली अन् तो कलाकार नी लेखक कधी प्रेक्षकांच्या गर्दीत हरवला समजलेच नाही..
पण तुझ्या लेखणाने मला पुन्हा प्रेक्षकांच्या गर्दीतून उठून विंगेत यावेसे वाटतय.
होऊ दे पुन्हा तिसरी घंटा.. गाजु दे नांदी आणि होउ दे प्रवेश...
Thank u babde for nostalgic trip.. 😭
अप्रतिम, पुर्ण imagine करुण वाचल मी तर.
खुप भारी वाटल वाचून, बगायला कधी मिळणार काय माहित🤔