तल्लफ..!
- Harshali

- Apr 14, 2020
- 2 min read
वरती नाव वाचून तसा तुम्ही काहीसा अंदाज बांधलाच असेल म्हणा. अगदी बरोबर! आजचा हा Blog असणारे 'चहा'साठीच! Corona बाबांच्या कृपेने मिळालेलं lockdown आणि त्यामुळे करावं लागणारं Work From Home यामुळे सध्या याच्याशी जरा जास्तच गप्पा गोष्टी चालू झाल्यात.नवरा घरी असला कि "आज हा मस्त बेत कर, हे बनवूयात का?"या फर्माइशी जोर धरतातच. त्यात नुकत्याच लागलेल्या पण अजून कामावर रुजू होण्याची तारीख न मिळालेल्या नोकरी साठी थोडाफार अभ्यास करणं हि आलंच. त्यात नंतर वेळ मिळणार नाही म्हणून आज kitchen साफ करूयात तरी कधी कपाट आवरुन ठेवूयात हि कामंही डोकं वर काढतातं.या साऱ्या पसाऱ्यातून जेव्हा दमायला होता तेव्हा हळूच साखरेचा आणि चहापावडरचा डब्बा किचेन ट्रॉली मधून डोकावून आपल्याला धीर देतो. आजकालच्या Black Coffee आणि Dalgona Coffee च्या जमान्यात मी मात्र कायमच चहाप्रेमी राहिलीये. हवंतर या बाबतीत काहिशी old school आहे म्हणा! पण खरं सांगू का गॅसवरच्या वाफाळलेल्या चहात थकवा घालवायची जी क्षमता आहेना,ती दुसऱ्या कशातच नाही.अहाहा.. नुसतं चहा म्हटलं तरी काय तरतरी येतेय! लग्नाआधी घरी असताना सकाळच्या वर्तमानपत्रासोबत चहा हवाच. गरम गरम चहा सोबत गरम गरम बातम्या.अगदी लहान असताना गावी गेलो कि एकत्र कुटुंबपद्धती असल्याने संध्याकाळी १५-१७ जणांसाठी चहाचं आधण ठेवलं जायचं. अन चहा हि कपातून वगैरे नाही, तर अगदी ग्लासातून दिला जायचा.अर्धा चहा आणि अर्धा दूध मिक्स करून. ती गम्मतच वेगळी होती. लग्नानंतर सकाळी गॅलरी मध्ये बसून सासूबाईंसोबत त्यांनीच केलेल्या चहाचे घुटके घेत गप्पा मारण्याची तर फार आठवण येते. चहा एकच पण त्यासोबतच्या आठवणी मात्र वेगवेगळ्या.
थोडंसं पाणी, तेवढ्याच प्रमाणात दूध, हविताशी साखर आणि थोडीशी जास्त चहापावडर घालुन त्यात मस्तपैकी आलं किसून टाकावं वरती थोडीशी सुंठ आणि इलायची टाकून मस्तपैकी उकळून घ्यावं. आणि मग छानशा संध्याकाळी आवडत्या लेखकाचं पुस्तक वाचत वाचत चहाचा आस्वाद घ्यावा. त्यात जोडीला जर आयुष्याचा साथीदार गप्पागोष्टी करायला असेल तर मग चहाची लज्जत आणखीच वाढते. सुख याहून तरी काय वेगळं असतं हो! गरमागरम चहा २-३ घोटात संपवणाऱ्या लोकांबद्दल मला फार कुतूहल वाटतं. मला मात्र चहाला त्याचा संपूर्ण सन्मान द्यायला आवडतं.सर्वात आधी नाकानेच त्यातल्या आल्याचा,साखरेचा,इलायचीचा स्वाद घेऊन मग चहाचा पहिला घोट घ्यायचा! नुसत्या कल्पनेनेच सगळ्या रूममध्ये चहाचा सुवास पसरलाय असं वाटायला लागलंय.
मला का कुणास ठाऊक कधी कधी असं उगाच वाटत राहतं कि आपला आयुष्य हि या चहासारखंच नाही का? आपण हि आधी पाण्यासारखे निर्मळ असतो मग आपलं वयच त्यात दुधाचं काम करतं. हळू हळू चहापावडर आणि साखरेसारखं, सुखदुःख आपल्या आयुष्यात येतात. लग्न, कामातलं प्रमोशन आणि असेच बरेचसे गोड प्रसंग अजून जीवनाची लज्जत वाढवतात.आपल्या आयुष्याचा चहा आपल्याला हवा तसा,गोड किंवा कमी गोड किंवा एकदम कडक, बनवणं आपल्याच हातात नाही का? "झालं का नाही गं तुझं काम अजून? चहा तयार आहे"-पतीदेवांची हाक ऐकू आलीये तेव्हा हा लेख आता इथेच पूर्ण करते. पुन्हा भेटुयात लवकरच!




तसा मी पण काही चहा चा खूप मोठा fan नाही म्हणा..पण जेव्हा केव्हा ही सुट्टीनिमित्त घरी गेलो की आईने संध्याकाळी मस्त पैकी आलं टाकून बनवलेला गरमा गरम चहा प्यायची नक्कीच तल्लफ होते आणि ती गोष्ट आईला कधी सांगावी नाही लागत. ती इतर वेळेस आलं टाकून चहा बनवो अगर ना बनवो पण मी असल्यावर मात्र होतोच चहा....आणि आता या lockdown मध्ये घरापासून 1200 km दूर असून पण या blog ने घरची आठवण करून दिली...पुन्हा त्या आठवणींना उजाळा मिळाला......nice written... Thanks for this.
Keep it up....👍👍👌👌
Chaha chi takkar coffee or kai te navin dalgona coffee wale nahi samjhenge...
Khul bhari pyavi lagte ata chaha 😋